PHOTO : ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ ; अमित ठाकरे यांनी राबवली चौपाटीवर स्वछता मोहीम

205 0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज ‘आपला समुद्र किनारा, आपली जबाबदारी’ या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

या सर्वांनी गणेश विसर्जनानंतर समुद्राच्या भरती ओहोटीमुळे किनाऱ्यावर आलेले गणेश मूर्तींचे अवशेष तसंच निर्माल्य गोळा करून ते स्थानिक प्रशासनाकडे सोपवले. यावेळी अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे उत्फुर्त कार्यकर्ते , विद्यार्थी यांनी देखील सहभाग घेतला .

तर रत्नागिरीत मांडवी येथे सकाळी ८ ते १० दरम्यान पक्षातर्फे राबवण्यात आलेल्या समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेत पक्षाचे पदाधिकारी, असंख्य नागरिक तसंच विद्यार्थी सहभागी झाले.

Share This News
error: Content is protected !!