पुनरागमनाय च ! आज गणरायाला निरोप देण्याचा दिवस ; मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी …

361 0

गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीच आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इ.सोळा उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला विविध २१ पत्री अर्पण केल्या जातात. पावसाळ्यात या सर्व पत्री सामान्यत: उपलब्ध असतात आणि त्या प्रत्येक वनस्पतीला काही औषधी गुणधर्मही आहेत. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात.

See the source image

‘यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।।

श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात. काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच,सात, दहा दिवस केले जाते.काही कुटुंबात २१ दिवस हे व्रत करतात तर काही ठिकाणी हे व्रत वार्षिक स्वरूपाचे असते. या दिवशी किंवा घरात गणपती असेपर्यंत अथर्वशीर्ष स्तोत्राचे पठण केले जाते. काही ठिकाणी गणेश गीता या ग्रंथाचे वाचनही केले जाते.

गणेशोत्सव
गणपती ही संघटनेची देवता आहे.ऋग्वेदात ब्रह्मणस्पती देवतेची स्तुती केलेली आहे. तो सर्व गणांचा अधिपती आहे असे त्यात म्हटले आहे. या देवतेचा विकास होऊन पुराणकाळात तिला गणपती हे रूप प्राप्त झाले असे मानले जाते. भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो.

सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात

See the source image

भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगांचे औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत करण्याचा प्रयत्न केला.

Share This News
error: Content is protected !!