अमरावती आंतरधर्मीय विवाह प्रकरण : ‘ती’ बेपत्ता तरुणी अखेर साताऱ्यात सापडली; आज अमरावतीत आणण्यात येणार…

409 0

अमरावती : अमरावतीमधील आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील बेपत्ता तरुणी अखेर काल साताऱ्यात सापडली. आज तिला अमरावतीत आणण्यात येईल, अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली.

आंतरधर्मीय विवाह प्रकरणातील तरुणी बेपत्ता असल्याच्या कारणावरून काल खासदार नवनीत राणा आणि पोलिसांमध्ये खडाजंगी झाली होती. नवनीत राणा यांनी काल ज्या मुलीला शोधण्यासंदर्भात पोलिसांना अल्टिमेटम दिला होता ती मुलगी अखेर सापडली. ही मुलगी सातारा पोलिसांच्या ताब्यात होती. आज तिला अमरावतीला आणण्यात येणार आहे.

See the source image

काल ज्या पोलिसांसोबत खासदार नवनीत राणा यांनी खडाजंगी केली त्याच पोलीस अधिकाऱ्यांचं भाजपनं राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. लग्नानंतर मुलीला डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर या प्रकरणी कांदे -बटाटे विक्री करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, याप्रकरणातील तरुणी रेल्वेनं एकटीच प्रवास करत असल्याचं समजल्यानंतर पुणे रेल्वे पोलीस आणि सातारा पोलिसांशी तिचं लोकेशन शेअर करण्यात आलं आणि अखेर ती तरुणी सातारा रेलवे पोलिसांना सापडली. ही तरुणी आज अमरावतीत दाखल होईल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली.

Share This News
error: Content is protected !!