“तुमची हिम्मत कशी झाली माझा फोन रेकॉर्ड करण्याची…” खासदार नवनीत राणांचा पोलीस स्टेशनमध्ये राडा ; पहा व्हिडिओ

461 0

अमरावती : खासदार नवनीत राणा आज अमरावतीच्या पोलिसांवर चांगल्याच कडाडल्या आहेत. विषय होता लव्ह जिहाद प्रकरणातून एका मुलीचं झालेलं अपहरण आणि त्यावरून नवनीत राणा यांनी केलेल्या चौकशी दाखल फोन अमरावती पोलिसांनी रेकॉर्ड केल्याचा ….

अमरावतीमध्ये राहणाऱ्या एका मुलीचं अपहरण करून तिच धर्मांतर करण्यात येत आहे, असा आरोप नवनीत राणा यांनी केला. याप्रकरणी त्यांनी अमरावती पोलीस स्टेशनमध्ये फोन केला होता. त्यावेळी फोन सुरू असताना काही मिनिटांनंतर हा फोन रेकॉर्ड करण्यात आला. यावरूनच खासदार नवनीत राणा प्रचंड संतापल्या आणि लोकप्रतिनिधींचा फोन कोणत्या अधिकाराखाली रेकॉर्ड करता असा थेट सवाल करून त्या आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide