अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी केली उमेदवाराची घोषणा ; दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी जाहीर

656 0

मुंबई : अंधेरी पूर्वचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे निधन झाले. या जागेवर आता पोटनिवडणूक होत आहेत. दरम्यान या जागेसाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा उमेदवार घोषित केला आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व मधून उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

दरम्यान शिवसेना नेमकी कोणाची ? यावर अद्याप सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे. शिवसेना नक्की कोणाची याप्रकरणी आता सुप्रीम कोर्टाच्या घटनापिठासमोर सुनावणी होणार आहे .सुनावणी होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तथापि शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय लवकरात लवकर लावावा या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये रिट याचिका दाखल केली आहे.

त्यामुळे शिवसेना पक्ष चिन्हावर नक्की कोण निवडणूक लढवणार हा संभ्रम कायम राहणार आहे. ही पोट निवडणूक होईपर्यंत जर या प्रकरणाचा निकाल लागला नाही तर पक्ष चिन्ह गोठवलं देखील जाऊ शकतं

Share This News
error: Content is protected !!