“तू ठाकरे है, तो मै भी राणा हु… देखते है किसमे कितनी ताकद है…!” खासदार नवनीत राणांचा थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

382 0

जळगाव : जळगावमध्ये खासदार नवनीत राणा यांनी एका गणपती मंडळाच्या कार्यक्रमास हजेरी लावली. दरम्यान हनुमान चालीसा पठण प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा आवाज उठवला आहे. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत आव्हान दिले आहे. खासदार नवनीत राणा म्हणाल्या की “तू ठाकरे हे तो मै भी राणा हू… मुंबई की बेटी और विदर्भ की बहू… देखते है किसने कितनी ताकद है…! असा थेट इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

तसेच “महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि राज्यावरच संकट दूर व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालीसा पठण केलं पाहिजे, अशी मी विनंती केली होती. पदाने, वयाने मोठे आहेत म्हणून मी हात जोडून विनंती केली होती. की हनुमान चालीसा पठण करा. त्यांनी केल नाही म्हणून आम्ही हनुमान चालीसा म्हणायचं ठरवलं, परंतु उद्धव ठाकरे यांनी धमकी दिली ज्या पायाने तुम्ही आलात, त्या पायाने वापस जाणार नाहीत… त्यानंतर मी सुद्धा ठणकावून सांगितलं, ” मै मुंबई की लडकी हू और विदर्भ की बहु ,इतनी कमजोर नही… तू शिवसेना वाला है ,तू उद्धव ठाकरे है, तो मै भी राणा हू, मे विदर्भ की बहु हू ,तुम्हारे मे कितनी ताकद है और मुजमे कितनी आमना सामना होगी जायेगा… असे खासदार नवनीत राणा म्हंटले आहे.

त्याचबरोबर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी त्यांनी विरोध केला. आणि आम्हाला जेलमध्ये टाकलं . पण मी तुरुंगामध्ये बारा तास हनुमान चालीसा पठण केलं . त्यांना वाटलं की महिला जेलमध्ये टाकल्यावर काही बोलणार नाही. पण माझ्या भक्तीची ताकद दाखवली . त्यांचा उभा राहणारा कार्यकर्ता देखील उरला नाही . अशा भाषेत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!