दिल्ली : जॅकलीन फर्नांडिसनंतर नोरा फतेही मनी लॉन्ड्री प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर ; नोराची दिल्ली पोलिसांकडून सहा तास कसून चौकशी

314 0

दिल्ली : तिहार जेलमध्ये असणाऱ्या सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित मनी लॉंडरिंग प्रकरणी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिला तीनच दिवसांपूर्वी समन्स बजावण्यात आले आहे. जॅकलीनला 26 सप्टेंबरला दिल्लीच्या पतीयाळा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. दरम्यान 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखर याने जॅकलीन फर्नांडिससह नोरा फतेही हिला देखील महागड्याकार आणि भेटवस्तू दिल्या होत्या. दरम्यान नोरा फतेही हीची देखील दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेनं तब्बल सहा तास कसून चौकशी केली आहे. यामध्ये तिला पन्नास प्रश्न विचारण्यात आले असल्याचे समजते.

See the source image

सुकेश चंद्रशेखर विरुद्ध दिल्ली न्यायालयात दाखल असलेल्या पुरवणी आरोप पत्रामध्ये जॅकलीन फर्नांडिसचे नाव सह आरोपी म्हणून देण्यात आले आहे. याप्रकरणी जॅकलीन फर्नांडिस हिने म्हटले होते की , सुकेश चंद्रशेखर कडून भेटवस्तू स्वीकारणाऱ्या सेलिब्रिटींना साक्षीदार बनवण्यात आले. पण मला आरोपी करण्यात आले.दरम्यान याप्रकरणी आता नोरा फतेहीची देखील कसून चौकशी करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!