“उडत्या बसेस ,पर्वतीचा रोप वे ; निवडणुका आल्या की पतंगबाजी यांना सुचते अशी ” ; आनंद दवेंची नितीन गडकरींवर खरपूस टीका

366 0

पुणे : ” यातील काहीही होणार नाही. या केवळ घोषणाच राहणार , बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, असे म्हणत केवळ निवडणुका आल्या की पतंगबाजी यांना सुचते अशी टीका आनंद दवे यांनी यावेळी केली आहे .

नितीन गडकरी काल पुणे दौऱ्यावर होते . यावेळी शहरातील वाहतूक कोंडी या विषयावरील त्यांच्या वक्तव्याने विरोधक त्यांना मोठ्या प्रमाणावर घरात आहेत . यावेळी पत्रकारांशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले कि , ” पुण्यात वाहतूककोंडीची मोठी समस्या आहे. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होत आहे. उडत्या बसेसची योजना पुण्यात आणली, तर वाहतुकीची समस्या कमी होण्यास फायदा होईल, असे नितीन गडकरी म्हणाले होते.”

दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावर अखिल भारतीय हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी देखील खरपूस टीका केली आहे . आनंद दवे म्हणाले कि , पुण्याच्या दोन महानगरपालिका होणार नाहीत, स्काय बस होणार नाही, पर्वतीचा रोप वेदेखील होणार नाही. हे सगळे फेक आहे. एवढ्या वर्षात का नाही दुसऱ्या महानगरपालिकेसाठी अभ्यास केला ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Share This News
error: Content is protected !!