VIDEO : गणेशोत्सव काळात सोलापुरातून 5 हजार लीटर हातभट्टीची दारु जप्त

317 0

सोलापूर : सोलापूरमध्ये गणेशोत्सव काळात 5 हजार लीटर हातभट्टीची दारु जप्त करण्यात आली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी गावातून ही दारु हस्तगत करण्यात आली.

सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं शुक्रवारी दुपारी 12 च्या सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोड्डी तांड्यात एका घरात छापा टाकला. यामध्ये तब्बल 5 हजार 165 लिटर हातभट्टी दारू आणि 1 टन 110 किलो गूळ पावडर आढळून आली. या ठिकाणावरुन 4 रिकामे प्लास्टिक बॅरल, 20 रिकाम्या रबरी ट्यूब, 1 मोबाईल, 1 मोटरसायकल असा एकूण 3 लाख 59 हजार 450 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपी भिमराव राठोड याला अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सोलापूर अधीक्षक नितीन धार्मिक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

Share This News
error: Content is protected !!