HEALTH WEALTH : ‘ या ‘ सोप्या उपायांनी डोळ्यांचे आरोग्य आणि सौंदर्य राखा अबाधित

302 0

हे सुंदर जग अनुभवण्यासाठी , पाहण्यासाठी निसर्गाने दिलेला सुंदर अवयव म्हणजेच डोळे आहेत . डोळ्यांचा रंग कोणताही असू द्या परंतु जेव्हा ते डोळे निरोगी असतील तेव्हा ते नेहमीच घायाळ करत असतात . अगदी लहान बाळाचे डोळे गोल टपोरे दिसतात . त्या निरागस आणि लोभस डोळ्यांपासून ते एखाद्या स्त्रीचे सुंदर डोळे नेहमीच आकर्षित करत असतात.  परंतु सध्याचे धावपळीचे जीवन, प्रदूषण, कम्प्युटर वरील कामकाज ,अपुरी झोप अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांचे आरोग्य आणि सौंदर्य नेहमीच पणाला लावले जाते . यासाठी काही खास टिप्स आज सांगणार आहे. 

  • कॉम्प्युटरवर काम करताना डोळ्यांना नंबर असो किंवा नसो झिरो नंबरचा चष्मा नक्की वापरा . यामुळे कम्प्युटर मधील घातक रे थेट डोळ्यात जाणार नाहीत.
  • उन्हात घराच्या बाहेर पडत असताना गॉगल वापरणे आवर्जून लक्षात ठेवा. यामुळे अति प्रखर सूर्यप्रकाश ,धूळ यांपासून डोळ्यांचे संरक्षण होईल.
  • घरामध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये नेहमी चांगल्या प्रतीचा (वैद्यकीय सल्ल्यानुसार असल्यास उत्तम) आय ड्रॉप नक्की ठेवा . गरज पडेल तेव्हा वापरू शकाल.
  • विनाकारण डोळ्यांना चोळणे बंद करा . गरज पडल्यास थंड पाण्याने डोळे आणि चेहरा स्वच्छ धुवा . डोळे चोळल्यामुळे हातातील जंतू थेट डोळ्यांच्या संपर्कात येऊ शकतात.
  • कॉम्प्युटरवर अधिक काम होत असल्यास रात्री झोपताना डोळ्यांवर थंडगार दुधाच्या कापसाच्या पट्ट्या ठेवा किंवा गुलाब पाणी आणि एलोवेरा जेल एकत्र करून या थंडमिश्रनाच्या कापसाच्या पट्ट्या डोळ्यांवर ठेवा . यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो डोळ्या खालची काळी वर्तुळ कमी होतात आणि शांत झोप लागते.
  • जेवणामध्ये ‘ अ ‘ जीवनसत्वाचे प्रमाण वाढवा.
  • पुष्कळ पाणी प्या.
Share This News
error: Content is protected !!