” पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात तेव्हा शिवसेनाप्रमुखांचे विचार आठवले नाहीत का ? ” रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

351 0

मुंबई : उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदार यांच्यातील वाद रोजच नव्या रूपाने समोर येत असतात. शाब्दिक चिखल फेक सुरू असतानाच आता रामदास कदम यांनी पुन्हा एकदा थेट उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. यावेळी रामदास कदम म्हणाले की , ” शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा आहे असे सांगत किती दिवस महाराष्ट्राला ब्लॅकमेल करणार आहात ? उद्धव ठाकरे यांनी त्यांची भावनात्मक डायलॉगबाजी थांबवावी . सत्तेसाठी शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसलात, तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आठवण झाली का ? असा थेट सवाल रामदास कदम यांनी केला आहे.

शिवसेना कोणाची हा वाद सुरूच आहे . उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यामध्ये या वादावर आता रामदास कदम यांनी मोठे भाष्य केले आहे . यावेळी ते म्हणाले की , ” उद्धव ठाकरेंना जे मिळाले ते शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मिळाले , आदित्य ठाकरेंना जे पक्षात सत्तेत स्थान मिळाले ते उद्धव ठाकरेंचा मुलगा म्हणून मिळाले असल्याचे सांगून पक्ष संघटना कोणी वाढवली ? ” असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे . तर पक्ष संघटना ही आपल्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी वाढवली असे स्पष्ट मत रामदास कदम यांनी मांडले आहे .

Share This News
error: Content is protected !!