पुण्यात गणेशोत्सव काळात पादचाऱ्यांसाठी एकेरी व दुहेरी मार्ग ; वाहतूक विभागाने काय केले बदल ? पाहा

376 0

पुणे : गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून 1 ते 9 सप्टेंबरपर्यंत पादचाऱ्यांसाठी मार्गात बदल केले आहेत. देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने एकेरी आणि दुहेरी मार्ग आखण्यात आले आहेत. कसे बदल करण्यात आले आहेत ते पाहूया..

पादचारी एकेरी मार्ग

  • जिजामाता चौक ते रामेश्‍वर चौक (फक्त जाण्यासाठी. रामेश्‍वर चौकाकडून येण्यास बंदी)
  • बेलबाग चौक ते बाबू गेणू गणेश मंडळ (फक्त जण्यासाठी. बाबू गेणू गणेश मंडळाकडून येण्यास बंदी)
  • बेलबाग चौक ते गणपती चौक (फक्त जाण्यासाठी. गणपती चौकाकडून बेलबाग चौकाकडे येण्यास बंदी)
  • गणपती चौक ते तुळशीबाग गणपती ते काका हलवाई चौक ते बाबू गेणू गणेश मंडळ (काका हलवाई चौकाकडून तुळशीबाग गणपतीकडे येण्यास बंदी)
  • तुळशीबाग गणपती ते जिलब्या मारुती गणपती चौक (जिलब्या मारुती गणपती चौकाकडून येण्यास बंदी)
  • दत्त मंदिर ते क्रांती हॉटेल (क्रांती हॉटेलकडून दत्त मंदिराकडे येण्यास बंदी )

पादचारी दुहेरी मार्ग

  • पुरम चौक ते गाडगीळ पुतळा चौक
  • अप्पा बळवंत चौक ते मोती चौक
  • फडके हौद चौक जिजामाता चौक ते फुटका बुरुज गाडगीळ पुतळा चौक ते
  • फडके हौद चौक मोती चौक ते सोन्यामारुती चौक, शुक्रवार पेठ चौकी ते रामेश्‍वर चौक

नागरिकांनी या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याकडून करण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!