‘ या ‘ कारणासाठी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन घेतली भेट ; 1 तासाच्या चर्चेनंतर …

377 0

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष अद्याप देखील संपला नाहीये. प्रत्येक पक्ष सध्या एकमेकांवर शाब्दिक टीकाटिप्पणीसह अगदी धक्काबुक्कीवर देखील येत आहेत. शिवसेनेने नुकतीच संभाजी ब्रिगेड सोबत युती केली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकीय भविष्य कसे असेल यामध्ये ट्विस्ट आला असतानाच , आता राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे .

ही भेट अचानक झाली . आज सकाळी आठ वाजता राज ठाकरे हे अगदी अनपेक्षितपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते . त्यानंतर एक तासभर ते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करत होते. दरम्यान त्यांच्या या तासभराच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे रोजच नवीन समीकरण आखले जात असताना , आता पुन्हा एकदा राज ठाकरे आणि भाजप एकत्र येणार का ? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान राज ठाकरे हे आपल्या शिवतीर्थ या निवासस्थानी पहिल्यांदाच गणपती स्थापना करणार आहेत. त्यानिमित्त श्री गणेशाच्या दर्शनासाठी सहकुटुंब येण्याचे आमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले होते.

Share This News
error: Content is protected !!