” शिवसेनेचे जिंकणे हे आता स्वप्नच बनून राहणार , त्यामुळे आता दौरे करून काय मिळणार ?” गिरीश महाजनांची आदित्य ठाकरेंवर टीका

290 0

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मोठी उलथा पालथ झाली. दरम्यान पक्षाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी आणि पक्षाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांना उभारी देण्यासाठी सध्या आदित्य ठाकरे शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरे करत आहेत . आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळत असतानाच , गिरीश महाजन यांनी टीका करताना म्हटलं आहे की , ” शिवसेनेचे जिंकणे हे आता स्वप्नच बनवून राहणार आहे. शिवसेनेची अवस्था काय झाली आहे , ते आपण बघत आहोत. त्यांनी हाताने आणि स्वतःहून अशी परिस्थिती ओढावून घेतली आहे. त्यामुळे आता दौरे करून काय मिळणार ? तसेच स्वतःच्या पेपरमध्ये लिहून आणून काय होणार ? असा सवाल गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे .

Share This News
error: Content is protected !!