गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी झाली का ? सगळे साहित्य आणून झाले आहे ? तरीही एकदा पूजा सामानाची ही लिस्ट चेक करा …

446 0

गणपती बाप्पांचं येत्या बुधवारी 31 ऑगस्टला आगमन होते आहे. श्री गणेशाचे आगमन म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाचा तो भावनिक कप्पा आहे, ज्याचा ओलावा कधीही कमी होणार नाही. बाप्पाचं आगमन म्हटलं की, अगदी घराच्या कानाकोपऱ्याच्या स्वच्छतेपासून ते यावर्षी श्री गणेश मूर्ती कशी असावी इथपर्यंत तयारी सुरू असते. मग कोणत्या दिवशी कोणता प्रसाद करावा, उकडीचे मोदक घरी बनवण्यासाठी सर्व पदार्थ आहेत ?का इथपासून गृहिणी विचार करत असतात . तर घरचे घराबाहेर पडले कि वेगवेगळ्या मूर्तींवरून नजर फिरवतच असतात.

See the source image

यावर्षी मूर्ती कशी असावी बरं… ! हा विचार नक्कीच प्रत्येकाच्या मनात असतो . पण मग ऐनवेळी एखादी वस्तू राहायला नको मग तुम्हीही लिस्ट केलीच असेल नसेल केली तर ही लिस्ट तुम्हाला मदत करू शकते..

See the source image

हळदी कुंकू ,गुलाल ,रांगोळी ,फुले ,दूर्वा ,तुळशी ,बेल ,विड्याची पाने ,गूळ ,खोबरे ,पंचामृत बनवण्यासाठी (दूध ,दही, तूप ,मध ,साखर) गंध ,जानवे ,कापूर ,उदबत्ती ,नारळ ,खारीक ,बदाम ,फळे ,तेल वात , तूप वात

फुलांमध्ये – लाल कमळ ,केवडा ,गोकर्ण ,जास्वंद इत्यादी

See the source image

पत्री 21 प्रकारची : मोगरी ,माका ,बेलाचे पान,पांढऱ्या दुर्वा, बोरीचे पान ,धोत्र्याचे पान ,तुळस, शमी ,आघाडा ,डोरली, कनेर ,रुई ,अर्जुनसादडा ,विष्णुकांता डाळिंब ,देवदार, पांढरा मरवा , पिंपळ ,जाई ,केवडा ,अगस्तीपत्र

पाट , चौरंग , शेला , पूजा करणाऱ्यासाठी कद (सोवळ) , श्री गणेशासाठी दागिने , सजावटीचे सामान आवडीप्रमाणे

See the source image

याव्यतिरिक्त श्री गणेश मूर्ती आपल्या पसंतीने निवडताना मोठे पोट ,मोठे कान अशी पाहून निवडा . त्यावर आपण सविस्तर पुढच्या लेखात पाहू..

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!