अंगावर काटा आणणारा आवाज ! NASA नं ऐकवला अंतराळ पोकळीतील वायू एकमेकांवर आदळल्या नंतरचा आवाज…

340 0

नॅशनल एरोनॉटिक्स ॲंड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा ! अंतराळ संशोधन करणाऱ्या या संस्थेनं अलिकडं एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमधून जो आवाज आता आपल्या कानावर पडेल तो ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सुरुवातीला या व्हिडिओमधला तो आवाज ऐकूयात मग तो आवाज नेमका कशाचा आहे हे सांगतो…

हा आवाज आहे अंतराळाचा राक्षस म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या ब्लॅक होलचा. अंतराळात असणाऱ्या पोकळीमुळं तिथं असणारे वायू जेव्हा एकमेकांवर आदळतात तेव्हा नेमका कोणता आवाज होतं हे नासानं जगाला ऐकवलंय. एखाद्या भयपटामध्ये भीती वाढवण्यासाठी ज्या आवाजाचा वापर केला जातो तसाच काहीसा हा आवाज आपल्या कानांवर पडतोय. ‘नासा’ नं दिलेल्या माहितीनुसार हा ब्लॅक होल पर्सियस गॅलेक्सी क्लस्टर मध्ये आहे जिथं गरम वायूचे अनेक पुंजके आहेत. इथं हा आवाज रेकॉर्ड करणं शक्य झालं कारण तिथं कोणत्याही प्रकारच्या कंपनाचा व्यत्यय नव्हता.

Share This News
error: Content is protected !!