” स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ! आई गेली, मी भिकारी झालो…! ” IPS कृष्ण प्रकाश यांची भावुक पोस्ट…

477 0

आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांच्या आईचं निधन झालं. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केलीये. आईचं निधन झालं अन् मी पोरका झालो, भिकारी झालो, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.

“आई, तुझी गणपती बाप्पावर अपार श्रद्धा होती. तू कायम तुझ्याजवळ बाप्पााची मूर्ती ठेवायचीस. तुझ्या शेवटच्या दिवसांतही तू बाप्पाला जवळ ठेवलंस. आता गणपती काही दिवसांवर आले आहेत. अशात तू गेलीस. हे सगळं मला अपेक्षित नव्हतं. तुझ्याशिवाय मी काहीच नाही. माझी आई गेली. तिच्याविना मी भिकारी आहे. “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” ! आईचं निधन झालं अन् मी पोरका झालो, भिकारी झालो. आई नेहमी आपल्यासोबत असते. आधी आपल्या आयुष्यात, नंतर कायमची आपल्या आठवणीत राहाते. जेव्हा आपण आपल्या प्रिय व्यक्तीला गमावतो तेव्हा आपल्याला स्वर्गात एक देवदूत मिळतो जो आपल्यावर लक्ष ठेवतो. मी माझ्या आईला गमावलं आहे. याचं दुःख मी शब्दात सांगू शकत नाही”, असं कृष्णप्रकाश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

Share This News
error: Content is protected !!