RAJ THACKREY : ” मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक ” ; मनसेचं नवं घोषवाक्य

367 0

पुणे : पुण्यात आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे सभासद यामोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी नवीन घोषवाक्य जाहीर केले. ‘मी हिंदवी रक्षक, मी महाराष्ट्र सेवक’, असं मनसेचं नवं घोषवाक्य आहे. असे राज ठाकरे म्हणाले. सदस्यनोंदणीला सुरुवात झाल्यावर राज ठाकरें म्हणाले, दरम्यान, गणेशोत्सव, दसरा, नवरात्र, दिवाळीत अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी आणखी एक मोहिम उघडली जाणार असल्याचे राज ठाकरे म्हणाले.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी, चौकात मनसेचे बॅनर, पोस्टर लागले पाहिजेत. ते कसे असावेत.काय काय असावे हे तुम्हाला कळविले जाईल. परंतू, मला ते सर्वत्र दिसायला हवेत .असेही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

पक्षातील उणीदुणी चव्हाट्यावर न येण्यासाठी राज ठाकरेंनी आपल्यातील वाद सोशल मीडियावर पोस्ट करून नयेत असा दम यावेळी पदाधिकाऱ्यांना भरला आहे. राज्यात दिवाळीनंतर कधीही निवडणुका लागू शकतात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी कधीही निवडणूक लागेल.असेही राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना म्हणाले आहेत.

Share This News
error: Content is protected !!