भोसरी : भोसरी येथील महावितरणच्या एका कनिष्ठ अभियंत्याला 50 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं तक्रार करणाऱ्या तक्रारदाराकडंच पन्नास हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी संतोषकुमार बालासाहेब गीते या महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला अटक करण्यात आली.
तक्रारदाराचं वीज कनेक्शन न तोडण्यासाठी या कनिष्ठ अभियंत्यानं तक्रारदाराकडं पन्नास हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. ही लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्याला रंगेहाथ पकडलं.