विधानसभेच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की प्रकरण ; सुप्रिया सुळे यांची थेट अमित शहा यांच्याकडे तक्रार , म्हणाल्या

427 0

मुंबई: शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्र विधानभवनाच्या आवारात माविआच्या आमदारांबद्दल हिंसक विधाने करून त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी तक्रार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात शिंदे गट आणि महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये विधानसभेच्या पायऱ्यांवर धक्काबुक्की झाली. त्यापार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी शहा यांच्याकडे ट्विटरच्या माध्यमातून तक्रार केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे गटाच्या आमदारांकडून माविआ आमदारांच्या सुरक्षेला असलेला वाढता धोका पाहून तुमच्या भाजप पक्षासोबत युतीचे सरकार चालवणाऱ्या लोकांच्या या वृत्तीवर कारवाई करावी आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी ही आमची विनंती आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

महाराष्ट्राच्या संस्कृतीशी असभ्य वर्तन सत्ताधाऱ्यांनी केले आहे. महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी लवकरात लवकर चर्चा करून परिस्थिती पाहता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा व लोकशाही मूल्ये शिकवा. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

Share This News
error: Content is protected !!