PHOTO : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन

354 0

पुणे : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज श्री संत तुकाराम महाराज शिळामंदिराचे दर्शन घेतले.

यावेळी देहू संस्थानचे नितीन महाराज मोरे,संजय महाराज मोरे,भानुदास महाराज मोरे, संतोष महाराज मोरे आदी उपस्थित होते.

देहू संस्थानच्यावतीने विश्वस्तांनी राज्यपालांचा सत्कार केला.

यावेळी राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी देहू संस्थानच्या नोंद वहीत अभिप्रायही नोंदवला.

जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे जीवन प्रेरणादायी असून त्यांचे अभंग अनेक युगापर्यंत मानवजातीला मार्गदर्शन करतील असे त्यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.

Share This News
error: Content is protected !!