सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन ; वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास

500 0

मुंबई : भाजपने त्या सोनाली फोगाट यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे . वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला . अभिनय विश्वात त्यांनी काम केले आहे. तर टीव्ही मालिकांमध्ये देखील त्यांची विशेष ओळख होती. tiktok या ॲपवर देखील त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते.

See the source image

टिक टोक स्टार पासून त्यांनी बिग बॉस पर्यंत देखील मजलमारली होती . बिग बॉसच्या चौदाव्या सीजनमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या . त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपमध्ये प्रवेश केला . आदमपूर मतदार संघातून त्यांनी हरियाणा कुलदीप विष्णू यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता.

आज गोव्यामध्ये त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर वयाच्या 41 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला . त्यांच्या मागे त्यांची मुलगी यशोदारा फोगाट या आहेत. तर 2016 मध्ये त्यांचे पती संजय यांचा मृत्यू झाला होता . त्यानंतर त्या मुंबईमध्ये राहत होत्या.

Share This News
error: Content is protected !!