HEALTH WELTH : आम्ल पित्ताने तोंड कडू पडते ? हे करा घरगुती उपाय

2310 0

एखादा पदार्थ आवडत नाही म्हणून न खाण किंवा एखादा पदार्थ आवडतो म्हणून अति प्रमाणात खाणं हे चुकीच आहे. बऱ्याच वेळा आपण एखादा पदार्थ आवडत असेल , तर भूक असो-नसो तरी आपण तो खातो. हे अन्न पचण्यासाठी खूप वेळ लागतो . त्यामुळे आपल्याला आम्ल पित्त किंवा ऍसिडिटीचा त्रास होतो.

आणि चक्कर येणं , जळजळ अशा समस्या निर्माण होतात . त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना तो प्रमाणात खाल्ला पाहिजे .
त्यातच अनेकदा ऍसिडिटी झाल्याचे लोकांच्या लक्षात येत नाही . ऍसिडिटी झाल्यावर त्याची कोणती लक्षणे जाणवतात आणि त्यावर काय उपाय आहे आपण जाणून घेणार आहोत .
१. मळमळणे
२. डोके दुखणे
३. तोंडाची चव कडवट होणे
४. पोटात जळजळ होणे
५. छातीत आग होणे
६. डोळ्याची जळजळ होणे
७. उलटी होणे
८. कडू आंबट पाणी तोंडात येणे
९. अस्वस्थ वाटणे
१०. करपट ढेकर
११. चक्कर येणे
१२. अंगाला खाज सुटणे

पित्तचा त्रास टाळायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे . त्यामुळे या गोष्टींकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे .

१. भूक नसल्यास विनाकारण जेवण करणं टाळा .
२. सकस आहाराचे सेवन करा , शक्यतो ताजी फळे भाज्या आणि कडधान्य यांचा समावेश करा.
३. भरपूर पाणी प्या
४. सोयाबीन , डाळी यांचा अन्नात समावेश करा
५. फास्ट फूड किंवा चटपटीत पदार्थ खाण्याची सवय अनेकांना असते . मात्र ती टाळली पाहिजे .
६. जंक फूड ,मसाल्याचे पदार्थ यांचे सेवन टाळा.
७. झोपेपूर्वी टीव्ही पाहणे , इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वापरणे किंवा कॅफिनेटेड पदार्थांचे सेवन टाळा
८. नियमित व्यायाम करा, पोहणे योगा करणे ,धावणे , अरोबिक्स किंवा जॉगिंग करा
९. जेवण झाल्यानंतर लगेचच अंथरुणात झोपणे टाळा
१०. मद्यपान आणि धूम्रपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहावं .
११. कांद्याचा रस किंवा टोमॅटो रस घेऊ नका किंवा कच्चा कांदा देखील खाऊ नका .
१२. जेवणाच्या वेळा निश्चित करा . रात्री अपरात्री खाण्याची सवय बंद करा.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide