पुणे : ब्राह्मण महासंघाच्या प्रतिनिधींनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची आज पुण्यात भेट घेतली. ब्राह्मण महासंघाने आपल्या विविध मागण्यांबाबत चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये खुल्या प्रवर्गातून ब्राह्मण समाजाला अधिकाधिक प्रतिनिधित्व दिलं जावं अशी मागणी ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आली आहे. दरम्यान ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक आयोजित करू अस आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण महासंघाला दिलं.
बैठकीनंतर चंद्रकांत पाटील आणि आनंद दवे यांनी माध्यमांशी संवाद साधला पाहूया.