पुणे महानगरपालिका : राष्टध्वजाचा अपमान करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा – ऋषिकेश बालगुडे

499 0

पुणे : केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनच्या आदेशानुसार १५ ऑगस्ट २०२२ अमृत महोत्सवी वर्षा निमित्त पुणे महानगरपालिका भांडार विभाग अंतर्गत पुणे मनपाने राष्टध्वज व इतर बाबींबाबत निविदा करण्यात आल्या. या निविदा मान्य केल्यानंतर संबधीत ठेकेदार पायल इंडस्ट्रीज, कल्पक इंटरप्राईजेस यांनी महापालिका भांडार विभाग यांच्याकडे जमा केले, हा राष्टध्वज स्वीकारताना मनपा भांडार विभाग अधिकारी यांनी ते ध्वज तपासणे गरजेचे होते.

हे ध्वज नागरिकांना देताना राष्टध्वज बाबत अनेक चुका समोर आल्या आहेत. उदारण- ध्वजावरील अशोक चक्र वेगळ्या ठिकाणी छापणे , कापड चुकीचे वापरणे हि बाब अतिशय खेदजनक असून प्रसिद्धी माध्यमांनी देखील याची दाखल घेतली .

या विषयाबाबत ध्वजसंहिता उल्लंघन झाले आहे. पुणे महानगरपालिका भांडार विभाग मार्फत कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु जाणूनबुजून संबंधित पुणे महानगरपालिका ठेकेदारांना पाठीशी घालत आहे. राष्टीय ध्वजाचा अपमान करणाऱ्या ठेकेदार पायल इंडस्ट्रीज, व कल्पक इंटरप्राईजेस यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. भांडार विभाग अधिकारी यांच्यावर खात्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऋषिकेश बालगुडे , विशाल गुंड यांनी केली आहे . या विषयी कारवाई बाबत मनपाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे .

Share This News
error: Content is protected !!