VIDEO : सांगलीत आढळलेल्या ‘त्या’ मगरीचा मृत्यू; मृत्यूचं कारण अस्पष्ट

235 0

सांगली : सांगली जिल्ह्यातील नांद्रे – ब्रम्हनाळ नदी काठावर आढळलेली अजस्त्र मगर मृतावस्थेत सापडली आहे. वन विभागाने ती मगर मृत असल्याचे घोषित केलं.

नदीकाठी बारा फुटी मगर आढळल्याने ग्रामस्थामध्ये भीतीच वातावरण होत. मात्र कित्येक तास एकाच ठिकाणी मगर आढळल्यानंतर नागरिकांनी आणि प्राणिमित्रांनी याबाबत वनविभागाला कल्पना दिली. वनविभागाने जागेवर जाऊन पंचनामा केला. वनविभागाने ती मगर मृत झाल्याचे घोषित केले. मगर ताब्यात घेऊन तिचे शवविच्छेदन करून नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

त्या मगरीच वय १५ वर्षा पेक्षा अधिक वय असण्याची शक्यता असून प्राथमिक अंदाजानुसार मगरीचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. तसच दोन मगरींच्या भांडणात मगरीचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र वनविभागाने अद्याप मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. ‘अहवाल’ आल्यानंतर त माहिती मिळणार आहे. मगरीचा एक पंजा तुटलेला आणि जबड्याजवळही बऱ्याच झालेल्या मोठ्या जखमा दिसून आल्या आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!