नुकतीच भाजपाच्या संसदीय समितीची पुनर्रचना करण्यात आली असून या समितीतून आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांना डावलण्यात आलं असून सर्वानंद सोनेवाल आणि येडियुरूप्पा यांचा समावेश करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपाने संसदीय समितीतून डावल्याने आता महाराष्ट्रातील एकही व्यक्ती या संसदीय समितीमध्ये नाही एकीकडे नितीन गडकरी यांना संसदीय समितीतून डावललं असलं तरी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र भाजपाने केंद्रीय निवडणुक समितीत स्थान दिलं आहे. नितीन गडकरी यांना डावलण्यात आलेली ही संसदीय समिती नेमकी काय आहे आणि त्याचं काम काय ते पाहूया
संसदीय समितीचं काम
भाजपची संसदीय समिती ही पक्षातली सगळ्यात महत्त्वाची समिती आहे. राज्यांमध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणात कुणाशी युती करायची, याचा निर्णय ही समिती घेते. तसंच वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभांमध्ये आणि विधान परिषदांमध्ये पक्षाचा नेता निवडीचं काम ही समिती करते.
नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या भाजपाच्या संसदीय समितीत कोणाचा करण्यात आलाय समावेश ते पाहूयात
जेपी नड्डा (अध्यक्ष)
नरेंद्र मोदी
राजनाथ सिंह
अमित शाह
बीएस येडियूरप्पा
सर्वानंद सोनोवाल
के. लक्ष्मण
इक्बाल सिंह लालपुरा
सुधा यादव
बीएल संतोष (सचिव)
नितीन गडकरी यांना संसदीय समितीतून डावल्यानं गडकरी यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न केंद्रीय भाजप नेतृत्वाकडून सुरू आहेत का अशा अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं यावर आता नितीन गडकरी काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल