‘ त्या ‘ वादग्रस्त पोलीस निरीक्षकाची अखेर उचलबांगडी ; महिलेच्या तक्रारीनंतर पुणे पोलीस आयुक्तांची कारवाई

425 0

पुणे : गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे . राजेश पुराणिक यांची बदली करण्यात आली असून त्या जागी आता पोलीस निरीक्षक विजय कुंभार हे जबाबदारी स्वीकार असल्याचे समजते.

अधिक वाचा : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातून क्रांतिकारकांची कामगिरी नव्या पिढीला कळेल- पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता 

काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता . या व्हिडिओमध्ये काही लोकांना त्यांनी एका रूममध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं . त्यासह एका व्यक्तीला चौकशीच्या नावाखाली ते मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसून येत होतं. या व्हिडिओवर अनेक नागरिकांनी रोष व्यक्त केला होता .

त्यासह एका महिलेला देखील त्यांनी मारहाण केली होती . या महिलेने राज्य महिला आयोगामध्ये तक्रार दिली होती . महिलेच्या या तक्रारीनंतर पुणे पोलीस आयुक्तांनी राजेश पुराणिक यांच्यावर कारवाई करून त्यांची बदली केली आहे.

अधिक वाचा : बुलडाणा की बुलढाणा ? जिल्हा प्रशासनाने केला संभ्रम दूर आता ‘असाच’ उल्लेख करा 

त्यांनी महिलेला किंवा लोकांना केलेली मारहाण यावर टीका होत असतानाच , दुसरीकडे शहरातील गैरव्यवहार ,अवैध धंदे संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी केलेली कारवाई ही देखील चर्चेचा भाग झाली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!