भाजपने संसदीय समितीतून नितीन गडकरींचे नाव वगळले ; महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘या’ समितीत एन्ट्री

425 0

नवी दिल्ली : भाजपने संसदीय समिती आणि निवडणूक प्रचार समिती जाहीर केली . ही संसदीय समिती एकूण 11 सदस्यांची असणार आहे. या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे असणार आहेत. भाजपच्या या निवडणूक प्रचार समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा असणार आहेत .

यासह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपच्या केंद्रीय प्रचार समितीत स्थान देण्यात आलं आहे. या समितीमधून दोन नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे . संसदीय समिती मधून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची नावं वगळण्यात आली आहेत . त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे . तर तीन नव्या चेहऱ्यांना सामावून घेण्यात आला आहे . यामध्ये कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस येडियुरप्पा , के लक्ष्मण आणि सर्वानंद सोनवाल यांचा समावेश आहे .

Share This News
error: Content is protected !!