मनमोहक दृश्य : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त उजनी धरण विद्युत रोषणाईने उजळले.. (VIDEO)

178 0

इंदापूर : उजनी धरणाची टक्केवारी ही शंभरी पार झाली आहे व दौंड वरून येणारा विसर्ग 56000 एवढा असल्याने उजनी धरणातून 16 दरवाजातून 41600 क्यूसेक्स ने पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे..

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत उजनी धरणावर या सोळा दरवाज्यावर तिरंग्याचा आकर्षक विद्युत रोषणाई आज पासून करण्यात आली आहे..

विद्युत रोषणाईमुळे सायंकाळी व रात्रीच्या वेळी मनमोहक दृश्य पाहायला मिळत आहे. याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. धरणावर पहिल्यांदाच अशा पध्दतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे..

Share This News
error: Content is protected !!