ASHISH SHELAR : आमचं ठरलं आहे…! भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धवजींच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करायचं … (VIDEO)

320 0

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांची आज दुसऱ्यांदा मुंबईच्या भाजप अध्यक्षपदी निवड झाली आहे . मुंबई अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे .

यावेळी ते म्हणाले की , ” गेल्या तीन दशकात शिवसेनेकडून केवळ कंत्राटदारांना पोहोचण्याचा काम केलं गेले. आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वास व्यक्त करून मुंबई शहरांमध्ये दिरंगाई आणि घोळ यापासून शिवसेनेचे नेते स्वतःचे हात बाजूला ठेवू शकत नाहीत. निकृष्ट दर्जाचे कोस्टल रोडचे काम असो किंवा मेट्रो तीनच्या माध्यमातून केलेला अहंकार यातून मुंबईकरांच्या डोक्यावर जो भुरदंड त्या ठिकाणी टाकण्यात आला आहे, ते पाप शिवसेनेच्याच माथ्यावर आहे .असे ते म्हणाले.”

“त्याचबरोबर शाळेतील संगणक खरेदी पासून सगळ्या विषयांवर महापालिकेतील आमचे सगळे सहकारी नेते अतिशय प्रामाणिकपणे काम करतात . मी मुंबईकरांना विश्वास देऊ इच्छितो,  जे गेल्या 25 वर्षात तुमच्या मनामध्ये होतं , जे 25 वर्षात गेल्या तुमच्या डोक्यात तुम्ही रंगवलं होतं ते तुमच्या मनातलं आणि तुमच्या डोक्यातलं चित्र पूर्णपणे साकारण्याचं काम हे भारतीय जनता पार्टी करेन . आम्हाला मुंबईकरांचे आशीर्वाद यासाठी नक्कीच मिळतील आणि म्हणूनच आमचं ठरलं आहे , भ्रष्ट व्यवस्थेने बरबटलेल्या उद्धवजींच्या शिवसेनेला मुंबईतून तडीपार करायचा आहे . आणि मुंबईकरांच्या मनातील स्वप्नातील डोक्यातील विकासाचे मुंबईचे चित्र रंगवून त्या मुंबईकरांना सुपूर्त करायचा आहे . अशी प्रतिक्रिया त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केली आहे

Share This News
error: Content is protected !!