ठळक बातम्यामनोरंजन

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक ; हृदयविकाराचा झटका आल्याने एम्स रुग्णालयात उपचार सुरू

विनोद वीर राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आहे. काल ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि त्यानंतर ते बेशुद्ध पडले होते . उपचारासाठी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं . हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नसून सध्या ते व्हेंटिलेटरवर असल्याचे समजते आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार , बुधवारी ट्रेडमिलवर धावत असताना अचानक त्यांच्या छाती तीव्र वेदना होऊ लागल्या , आणि त्यानंतर ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले होते . अशा परिस्थितीत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं . त्यांच्यावर एनजीओप्लास्टी देखील करण्यात आली असून , अद्याप त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली नाही . त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असल्याचं डॉक्टरांनी सांगितला आहे.