विनोदाचा बादशहा राजू श्रीवास्तव एम्स रुग्णालयात दाखल ; प्रकृतीमध्ये अचानक बिघाड

180 0

मुंबई : विनोदाचा बादशहा राजू श्रीवास्तव याला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . प्रकृतीमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

राजू श्रीवास्तव हे नाव जरी ऐकलं तरी आज भारतातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक हास्याची रेषा तरी उमटतेच विनोदाचा बादशहा असलेला राजू श्रीवास्तव यांनी आपल्या विनोदी शैलीने स्वतःची अशी ओळख देशांमध्ये निर्माण केली आहे. विनोदी भूमिका स्टँड अप कॉमेडी आणि सूत्रसंचालन यातून त्याने स्वतःचा ठसा बॉलीवूडमध्ये देखील उमटवला आहे

अशा या कॉमेडी किंग बाबत एक वृत्त समोर येते आहे राजू श्रीवास्तव यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ट्रेडमिलवर धावत असताना अचानक त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध पडले त्यानंतर त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे

Share This News
error: Content is protected !!