VIDEO : सरकार आम्ही चालवत आहोत ; मंत्री असल्याने कायदा तोडण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार ; पहा नेमकं काय म्हणाले नितीन गडकरी

250 0

नागपूर : महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सच्या नागपूर शाखेकडून मल्टी डिस्प्लेनरी मल्टी मॉडेल रिझल्टच्या अंतर्गत आदिवासी यांच्या आरोग्या करता ब्लॉसम नावाच्या प्रकल्पाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला.

नागपुरमधील एका कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले की ,”1995 मध्ये आदिवासी गावांमध्ये काम कारत असताना अनेक अडचणी येत होत्या. परंतु मी माझ्या मार्गानी सर्वं विकास कामे केली. मी अधिकाऱ्यांना सांगितले की ,आम्ही जे म्हणू तो कायदा ,कारण सरकार आम्ही चालवत आहोत. आम्हाला कायदा तोडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आम्ही मंत्री आहोत त्यामुळे कायदा तोडण्याचा अधिकार आहे. मी अधिकाऱ्यांना सांगतो मी जस संगिल तस काम करायचं . तुम्ही सांगाल तस सरकार चालणार नाही असं वक्तव्य केलं. पाहूया गडकरी नेमकं काय म्हणालेत ?

 

Share This News
error: Content is protected !!