JDU-BJP Alliance Broke : “भाजपने आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला”; बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे भाजपवर आरोप

230 0

बिहार : पाच वर्षानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आणि भाजप यांच्यातील युती तुटली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा दिला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहिती, नुसार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी व्हिडिओ खासदार आणि आमदारांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये नितेश कुमार म्हणाले की ,”भाजपने नेहमीच आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने माझा अपमान केला .2013 पासून आतापर्यंत भाजपाने फसवणूक केली आहे .”असे थेट आरोप मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहेत.

राजद काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी नीतीश सरकारला पाठिंबा देण्यासाठी पत्र तयार केला आहे . नितीश कुमार हे महाआघाडीचे मुख्यमंत्री असतील असे काँग्रेसचे आमदार शकील अहमद यांनी म्हटलं असून ,सर्व आमदार आणि खासदारांनी एकमताने एनडीए आघाडीतून बाहेर पडण्याचा ठरवलं. त्यानंतर मी राजीनामा दिला आहे. असे देखील नितेश कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल आहे.

Share This News
error: Content is protected !!