पुणे : हडपसरमध्ये स्कूल बसला आग

264 0

पुणे : आज सकाळी हडपसर मधील एंजल मिकी मिनी शाळेच्या आवारात शाळेच्या बसला अचानक आग लागली .शाळा प्रशासनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलास मिळालेल्या वर्दी नंतर जवानांनी शिताफीने ही आग नियंत्रणात आणली आहे.

अग्निशमन दलाचे जवान अनिल गायकवाड यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ,ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी. दरम्यान शाळा प्रशासनाने आग विझवण्याचा प्रयत्न केला .त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान पोहोचल्यानंतर आग विझवून कुलींगचे काम सुरू करण्यात आले . सुरक्षेच्या दृष्टीने योग्य शहानिशा करण्यात आली असल्याचं गायकवाड यांनी सांगितला आहे.

आज मोहरमची सुट्टी असल्यामुळे देखील मोठा अनर्थ टळला आहे .या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही

Share This News
error: Content is protected !!