पुराच्या पाण्याचा मृतदेहालाही बसला फटका ! वर्ध्यात पुरामुळं रुग्णवाहिकेत अडकून पडला मृतदेह… (VIDEO)

388 0

वर्धा : रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असलेला मृतदेह पुराच्या पाण्यात अडकून पडल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यात घडली. वेणी गावातील हर्षद घोरपडे या व्यक्तीचा नागपूर येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला होता. या व्यक्तीचा मृतदेह वेणी येथे नेताना ही घटना घडली.

हिंगणघाट तालुक्यातील पिपरी-जंगोना वेणी रस्त्यावरील पुलावरून पुराचं पाणी वाहतंय. नागपूर येथे उपचारादरम्यान मृत पावलेल्या व्यक्तीचा मृतदेह वेणी या गावी रुग्णवाहिकेतून नेण्यात येत असताना तो पुरामुळं अडकून पडला. अखेर रुग्णवाहिकेतून मृतदेह बाहेर काढून ग्रामस्थांच्या मदतीनं गावाला नेण्यात आला.

Share This News
error: Content is protected !!