TET Scam : अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावे TET घोटाळ्यात ; विरोधी पक्षाकडून जोरदार टीका ,आमदार अंबादास दानवे म्हणाले ..

218 0

TET Scam : शिक्षण पात्रता परीक्षा TET घोटाळ्या संदर्भात महाराष्ट्र शासनाप्रमाणेच ईडी कडून देखील चौकशी सुरू आहे. शिंदे गटातील आमदार माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव या घोटाळ्यामध्ये वादात सापडले आहे. त्यात अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची प्रमाणपत्र देखील रद्द करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

आत्तापर्यंत एकूण 7 हजार 874 विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत.तर भविष्यात आता या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षा देता येणार नाही.या टीईटी घोटाळ्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली हिना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उजमा नाहीद अब्दुल सत्तार शेख यांची नावे समोर आली आहेत.

सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघांमध्ये त्यांच्या सात शैक्षणिक संस्था आहेत.याच संस्थेत त्यांच्या मुली कार्यरत होत्या, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.दरम्यान शिवसेना माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींची नावे टीईटी घोटाळ्यात आल्यानंतर विरोधी पक्षाकडून त्यांच्यावर जोरदार टीका देखील केली जाते आहे.

शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी देखील कडाडून टीका केली आहे.यावेळी ते म्हणाले की,”जवळपास आठ हजार उमेदवारांचा घोटाळा बाहेर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे अब्दुल सत्तारांचाही कुठे संबंध आहे. याची देखील चौकशी झाली पाहिजे ज्यांचं या घोटाळ्यात नाव आला आहे ,ते महाराष्ट्राचे आधी महसूल मंत्री होते .ग्रामविकास मंत्री होते आणि आता त्यांना कॅबिनेट मंत्री व्हायचं आहे .त्यामुळे शिक्षण खातं मिळालं तर, आणखी चांगली चौकशी होईल असं वक्तव्य त्यांनी केला आहे. यावर तपास झालाच पाहिजे अशी मागणी शिवसेना करेल असे अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!