#CommonwealthGames2022 HIMA DAS : स्पर्धा पाहताना लोकांचेही पाणावले डोळे ; अवघ्या एक सेकंदाच्या फरकाने भारताने अंतिम फेरीतील स्थान गमावले (VIDEO)

326 0

#CommonwealthGames2022 : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये महिलांच्या 200 मीटर स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू हिमा दास ही अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवू शकले नाही हिमा दास हिने कठोर परिश्रम घेतले परंतु अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने तिचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश चुकला आहे.

महिलांच्या 200 मीटर स्पर्धेमध्ये हिमा दास हिने उपांत्य फेरीमध्ये 23.42 सेकंदात तिसरे स्थान पटकावले. तर नामीबिया तील क्रिस्टीन माबोम्मा आणि ऑस्ट्रेलियाच्या एला कोनोली हिने अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय स्थान मिळवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे . त्यामुळे भारतीय चहाते निराश झाले आहेत . त्यासह हिमादेखील अत्यंत निराश झाल्याचं पाहायला मिळालं .

परंतु हिमा दास हिने प्रचंड मेहनतीने भारताला आणखीन एक गोल्ड मिळवून देण्याचा प्रयत्न केला . अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने ती यशापासून लांब राहिली . परंतु तिच्या परिश्रमाचे सर्वांकडूनच कौतुक देखील होत आहे.

Share This News
error: Content is protected !!