पुणे : आज सिंगल युज प्लास्टीक बंदी कारवाई संदर्भात समज गैरसमज या विषयावर पुणे मनपा अतिरिक्त आयुक्त कुनाल खैमनार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे मनपा मुख्य बिल्डींगमध्ये बैठक पार पडली.
या बैठकीमध्ये केंद्र शासनाने प्लास्टीक बंदी आणि महाराष्ट्र राज्य शासनाने केलेली प्लास्टीक बंदी या दोनही नियमावली मध्ये काही फरक आहे, तसेच मुळ वापरात ज्याला पर्याय उपलब्ध नाही परंतू वापरणे अतिशय आवश्यक आहे.
अन्यथा नागरीकांच्या आरोग्याशी छेडछाड केल्यागत होईल, पॅकेजींग प्लास्टीक, बेकरी /अन्नधान्य /दुधाचे पदार्थ/ मिठाई /खाद्यपदार्थ/ महीलांचे सनासुदीचे विक्री साठी येनारे फराळ/ खाद्यपदार्थ तसेच लिक्वीड पदार्थ या संदर्भात 50 मायक्रोन चा वापर करावा तसेच एकदा वापरात येणारे प्लास्टीकच्या वस्तु (प्लास्टीकचे चमचे, ग्लास, स्ट्राॅ,काड्या,झेंडे,प्लास्टीक आवरण असलेले प्लेट ग्लास,गारबेज बॅग, ओव्हन बॅग,सिलवर फाॅईल बॅग) आणि कमी जाडीच्या प्लास्टीकच्या पिशव्या तसेच सर्व प्रकारच्या प्लास्टीकच्या कॅरीबॅग पुर्णपणे बंद करण्यात याव्यात.
या सर्व प्रक्रियेत समज गैरसमज या मध्ये रीटेल दुकानदार भरडला जातो .दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते .त्या संदर्भात पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन दिनकर निवंगुणे यांनी बाजु मांडली, उत्पादक यांच्या वतीने रवी जसनानी यांनी कायद्या संदर्भात त्यांनी माहीती दिली, किराणा व्यवसायातील अडचणी शहर अध्यक्ष सुनील गेहलोत यांनी बाजु मांडली.
महीला उत्पादक तसेच घरगुती व्यवसाय करणार्या महीलांन संदर्भात महीला अध्यक्ष शिल्पाजी भोसले यांनी बाजु मांडली, केटरिंग तसेच हाॅटेल व्यवसाय यांच्या संबंधित अध्यक्ष किशोर सरपोतदार,बेकरी व्यवसाय अध्यक्ष नासीर अन्सारी, आईसक्रीम व्यवसाय शहर उपाध्यक्ष कुमार खत्री, डेरी व्यवसाय संदर्भात रविंद्र सारूक, मिठाई उत्पादक केदार चितळे, कापड व्यवसाय सोहन कुमावत तसेच इतर स्टेशनरी व्हरायटी कटलरी व्यापारी प्रतीनीधी यांनी आप आपली बाजु मांडली.
या संदर्भात पुणे मनपा तसेच पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ संयुक्त पणे जनजागृती मोहीम करणार आहोत, तसेच स्वच्छ पुणे प्लास्टीक मुक्त शहर करण्यासाठी वेळो वेळी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विभागीय बैठका घेऊन काही नियोजन करण्यात येनार आहे, कापडी पिशव्या मोठ्या प्रमाणावर नागरींकाना स्वस्त दरात उपलब्ध करून देणे, बॅक पेमेंट पाॅलेसी करून नागरींकाना सहकार्य करणे, पॅकेजींग साठी वापरात येनारे प्लास्टीक दुकानदारांच्या सहकार्याने संकलन करून रीसायकल प्लॅन्ट पर्यंत पोहचविणे, प्लास्टीक मुक्त कचरा या साठी स्वच्छ संघटनेच्या माध्यमातून कचरा वेगळा करून कचर्यातील प्लास्टीक वेगळे करणे,भविष्यात वाॅर्ड स्तरावर एन्जीओच्या मदतीने प्लास्टीक रीसायकल प्लॅन्ट सुरू करून संपुर्ण प्लास्टीक गोळा करून त्या पासुन वेस्ट प्लास्टीकचा वापर करण्या संदर्भात नियोजन करण्यात येईल.
जेणेकरून नदी नाले कचरा डेपो शेतात जंगलात रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचा प्लास्टीक कचरा होणार नाही याचे नियोजन करण्यासाठी पुणे मनपा सोबत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ नक्कीच सकारात्मक प्रयत्न करेन, अशी माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघ अध्यक्ष सचिन दिनकर निवंगुणे यांनी दिली.
या बैठकीसाठी व्यापारी प्रतीनीधी ,पुणे मनपा अधीकारी, महाराष्ट्र पोलोशन कंट्रोल बोर्ड,स्वच्छ संघटना प्रतीनीधी, कचरा व्यवस्थापन अधीकारी, प्लास्टीक उत्पादक, तसेच प्लास्टीकच्या वापरातील विवध व्यवसायातील प्रतीनीधी उपस्थित होते.