न्यायमूर्ती लळित होणार भारताचे नवे सरन्यायाधीश

315 0

नवी दिल्ली: न्‍यायमूर्ती लळीत हे देशाचे ४९ वे सरन्‍यायाधीश ठरतील. २६ ऑगस्‍ट रोजी एन. व्‍ही. रमणा सेवानिवृत्त होत आहे. सरन्‍यायाधीश निवृत्त होण्‍यापूर्वी आपल्‍या नवीन सरन्‍यायाधीशांच्‍या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे करतात. त्‍यानुसार आज रमणा यांनी लळित यांच्‍या नावाची शिफारस केली.

त्यानंतर आता यूयू लळित यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी CJI एन. व्ही. रामणा यांना पत्र लिहून नव्या सीजेआयच्या नावाची शिफारस करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर रमणा यांनी पत्र लिहून यूयू लळित यांच्या नावाची शिफारस केली आहे.

जी परंपरा आहे त्यानुसार आपल्या सेवानिवृत्तीच्या एक महिना आधी चीफ जस्टिस बंद लिफाफ्यात आपल्या उत्तराधिकाऱ्यांचं नाव कायदा आणि न्याय मंत्रालयाला कळवतं. मंत्रालय हे नाव राष्ट्रपतींना कळवतं. सुप्रीम कोर्टात वरिष्ठ न्यायाधीश यांनी वरिष्ठता क्रमांक दोनचं नावच लिफाफ्यात असतं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांचा कार्यकाळ निश्चित स्वरूपाचा नसतो. सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या सेवानिवृत्तीचं वय संविधानानुसार ६५ वर्षे आहे.

Share This News
error: Content is protected !!