Supreme Court : सत्तासंघर्षावर आता 8 ऑगस्टला होणार सुनावणी ; प्रकरण ५ न्यायाधीशांच्या खंडपीठात जाणार ?

345 0

नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर आता 8 ऑगस्टला सुनावणी होणार आहे हे प्रकरण आता लार्जर बेंच कडे दिले जावे की नाही यावर सोमवारी 8 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे घटनापिठाकडे प्रकरण द्यायचं की नाही याचा विचार करू असे देखील कोर्टाने सांगितल आहे. पक्षाच्या चिन्ह बाबत कोणताही निर्णय घेऊ नका असे आदेश कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.

आज पुन्हा एकदा कोर्टामध्ये दोन्हीही वकिलांनी जोरदार युक्तिवाद केलाया सत्तासंघर्षाचे प्रकरण मोठ्या घटनापिठाकडे देण्याची गरज नाही ! असा युक्तिवाद कपिल सिब्बल आणि आज केला . यावर निर्णय आम्ही घेऊ असे सरन्यायाधीश यांनी स्पष्ट केले . शिंदे गटाने पक्ष सोडलेला नाही तर निवडणूक आयोगाकडे का गेले ? चाळीस आमदार अपात्र ठरल्यास त्यांच्या दाव्याला अर्थ काय ? असा देखील सवाल कपिल सिब्बल त्यांनी केला .

तर संपूर्ण प्रकरण आमदारांच्या बहुमतावर अवलंबून आहे . असा मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला आहे . शिंदे गटातील आमदार अपात्र ठरल्यास दावा होत नाही . अपात्रतेची कारवाई झाल्यास दाव्याचा मतं राहत नाही ,असं देखील मनु सिंघवी यांनी म्हटल आहे.

जोपर्यंत निवडणूक आयोगाचा संबंध आहे तोपर्यंत चिन्ह कायदेशीर बाब असल्याचं दातार यांनी यावेळी म्हटलं आहे . तूर्तास पक्षाचे चिन्ह बाबत कोणताही निर्णय घेऊ नका असे आदेश कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. दरम्यान आता 8 ऑगस्टला पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होणार आहे.

उपडेट करत आहोत , वाचत राहा

Share This News
error: Content is protected !!