मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली खासदार गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस

386 0

पुणे: पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.

गिरीश बापट यांच्यावर सध्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकनाथ शिंदे काल रात्री उशीरा आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांना जाऊन भेटले. गिरीश बापट यांनी स्वत: या भेटीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. आपल्या जुन्या सहकाऱ्यांना न विसरता व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांची आवर्जून विचारपूस करायला कधी न विसरणारे, माझे महाराष्ट्र विधिमंडळातील जुने सहकारी व मित्र महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब हे काल पुणे दौऱ्यावर आले असता आणि दिवसभर व्यस्त कार्यक्रम असतानाही वेळात वेळ काढून रात्री उशिरा रुग्णालयात येवून आवर्जून माझी भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी उदय सामंत, तानाजी सावंत, विजय शिवतारे, अजय भोसले, अनिल बाबर, बापू कोंडे, किरण साळी आदींनी विचारपूस केली, असे गिरीश बापट यांनी म्हटले आहे.

खासदार गिरीश बापट यांची फेसबुक पोस्ट खालील लिंकवर पाहा…

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0ot71cUqL3TiwqXG7nyUL5mW3VaMiMYsZQw2zcZFVHbDNZcgNVQfK1d9PEPfuNBjRl&id=100044368751801

 

Share This News
error: Content is protected !!