पुण्यातील दगडी नागोबा मंदिरात नागपंचमी उत्साहात साजरी (VIDEO)

378 0

पुणे : श्रावण महिन्यातील पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी. आज नागपंचमी निमित्ताने पुण्यातील दगडी नागोबा मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

पुण्याच्या प्राचीनत्वाची ग्वाही देणारे दगडी नागोबा देवस्थान गणेश पेठ आणि रविवार पेठ यांच्या हद्दीवर नागझरीकाठी असणारे हे वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण आहे.नागपंचमी निमित्ताने यात्रा भरवण्यात आली आहे. महिला दूध आणि लाह्यांचा नेवैद्य दाखवून नागदेवतेची पूजा करत आहेत. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय.हिंदू धर्मात सापांना सर्प देवता म्हणून पूजनीय मानले जाते.

नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा आणि उपवास केल्याने सर्पदंशाचा धोका कमी होतो. नागाची दुधाने स्नान करून पूजा केल्याने पुण्य प्राप्त होत असल्याचं देखील मानलं जातं. महिलांसाठी नागपंचमी सण महत्वाचा असतो. कोरोना काळातील दोन वर्षांनंतर सण साजरा करत असल्याने महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं.

Share This News
error: Content is protected !!