शैक्षणिक : UPSC CSE Mains 2022 परीक्षेची तारीख जाहीर ; पहा वेळापत्रक

249 0

UPSC CSE Mains 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2022 सालची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर परीक्षे संदर्भात नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यानुसार यूपीएससी 2022 ची मुख्य परीक्षा सप्टेंबर 2022 मध्ये पार पडेल.

वेळापत्रकानुसार नागरी सेवा मुख्य परीक्षा 16 17 18 आणि 24 25 सप्टेंबर 2022 रोजी घेण्यात येणार आहे ही परीक्षा दोन शिफ्ट मध्ये घेतली जाईल पहिली शेपटी सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत असेल तर दुसरी शिफ्ट ही दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत असेल

त्यासह यूपीएससी परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक देखील वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. यूपीएससी मुख्य 2022 वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

यूपीएससी प्रीलीम्स निकाल 2022 जून मध्येच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यूपीएससी प्रीलीम्स 2022 उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसू शकणार आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!