BHIMASAHNKAR MINI BUS

पुणे : श्रावण महिन्यात भीमाशंकरला जाण्यासाठी PMPML कडून विशेष सेवा (VIDEO)

473 0

पुणे : श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएलकडून विशेष सेवा देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. नेमकी काय सेवा देण्यात येणार आहे जाणून घेऊया सविस्तर.

श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवार आणि सोमवारी भीमाशंकर येथील पार्किग ते भीमाशंकर मंदिरापर्यंत 24 तास शटल सेवा देण्याचे नियोजन पीएमपीएमएलकडून करण्यात आले आहे.

या शटल सेवेकरीता पीएमपीएमएलच्या निगडी डेपोतील डिझेलवर धावणाऱ्या 12 मिडी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवार व सोमवार ही शटल बससेवा भाविकांसाठी 24 तास उपलब्ध असेल. निगडी डेपोतून श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी पहाटे 4 वा. या बसेस निघतील आणि सोमवारी रात्री उशिरा या सर्व बसेस निगडी डेपोमध्ये परत येतील.

मिडी बसेससाठी लागणारे डिझेल भीमाशंकर येथेच सर्व्हिस व्हॅन मधून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसंच बसमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी ब्रेकडावून व्हॅन देखील त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.पुणे जिल्ह्यातील प्रत्येक यात्रेसाठी पीएपीएसएलकडून विशेष सेवा दिली जाते. पावसाळ्यात श्रावण महिना असतो आणि मंदिर जंगलाच्या परिसरात असल्याने नागरीकांना सहजरित्या दर्शनासाठी जाता येत नाही त्यामुळे पीएपीएसएलकडून ही सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!