मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत ED कोठडी सुनावण्यात आली आहे. ED च्या पथकाने रविवारी संजय राऊत यांच्या निवास स्थानी छापा टाकला होता . रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली .
सुमारे नऊ तासाच्या चौकशीनंतर ईडी अधिकाऱ्यांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतलं . आज दुपारी राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात आलं असता, दोन्हीही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.