संजय राऊतांवर ही कारवाई अपेक्षित होती – छगन भुजबळ

290 0

संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.छगन भुजबळ म्हणाले, राऊतांवर ही कारवाई अपेक्षित होतीच, एकदा ईडीचा तपास सुरु झाला की त्यांचे ऑफिस, घर चेक करतात. ईथे भुजबळ फार्मवर पण किती वेळा धाडी पडतात, मोजता येत नव्हत्या एवढ्या पडल्या तपासाचा तो भाग आहे.अटक होईल का त्याबाबत बोलू शकणार नाही.छगन भुजबळ पुढे म्हणाले,संजय राऊतांच्या ऑडिओ क्लिप बाबत माहिती नाही, पोलिस चौकशी करतील, खऱ्या खोट्या गोष्टींना उत येत असतो. अर्जुन खोतकरांचे वक्तव्य ऐकले तर ते बोललेच की मी आणि कुटुंब अडचणीत आल्याने शिंदे गटात जातो आहे, आतापर्यंत आपण म्हणत होतो पण आता तिकडे जाणारेही सांगत आहेत अजून काय बोलायचे ? अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!