HEALTH TIPS : प्रेग्नेंसीमध्ये गुळ-पापडीचे लाडू आहेत वरदान ; हिमोग्लोबिनची राहणार नाही कमतरता ( Recipe )

241 0

HEALTH TIPS : प्रेग्नेंसीमध्ये अनेक महिला शरीरातील हिमोग्लोबिनच्या कमतरतेची अनेक वेळा तक्रार करतात. त्यामुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे अशा गोष्टी होत राहतात . बाळंतपणाची तारीख जसजशी जवळ येत जाते ,तसतसे पोटातील बाळाला देखील रक्तातून अनेक पोषक द्रव्य अधिकाधिक पोहोचवणं खूप गरजेचं असतं. अशावेळी गुळपापडीचे लाडू गरोदर मातांसाठी वरदान आहेत .

तुपाच्या रेसिपीस - 9 रेसिपीस - Cookpad

हे बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे तुपाची बेरी , तर आता तुपाची बेरी ही तूप कढवताना मागे राहते तेव्हाच हे लाडू बनवाल तर जास्त उपयुक्त ठरतील . तूप कढवून घेतल्यानंतर मागे राहणाऱ्या बेरीमध्ये गव्हाची कणीक गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या . हे सर्व मिश्रण थंड होण्यासाठी एका परातीमध्ये काढून घ्या. त्यानंतर तुपावर ओला काळा खजूर हलके काप करून भाजून घ्या. खजूर मऊ पडल्यानंतर तो मिक्सरमध्ये घाला . त्यानंतर काजू ,बदाम ,पिस्ता अक्रोड हे ड्रायफ्रूट्स घालून हे सर्व मिश्रण बारीक करून घ्या.

ओबडधोबड बारीक केले तरीही चालेल हे सर्व मिश्रण लाडूच्या मिश्रणामध्ये एकत्र करा. यानंतर गुळाची पावडर किंवा किसलेला गूळ यामध्ये घाला . हे सर्व मिश्रण एकजीव करताना दुधाचा शिपका मारून लाडू वळून घ्या . हे लाडू रोज सकाळी आणि संध्याकाळी खाल्ल्याने अगदी आठवड्याभरामध्ये रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास सुरुवात होते . लहान मुले ,वृद्ध व्यक्ती आणि आजारी व्यक्तींसाठी देखील हे लाडू खूप फलदायी आहेत.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide