मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथ घेऊन 25 दिवस झाले आहेत . मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नसताना देखील, प्रशासकीय पातळीवर मात्र कामाचा जोरदार धुमधडाका पाहायला मिळतो आहे . 24 दिवसात तब्बल 538 शासन निर्णय काढण्यात आले आहेत . या निर्णयांमध्ये पदोन्नती आणि सेवा संदर्भातील सर्वाधिक शासन निर्णय घेण्यात आले आहेत.
24 दिवसात घेण्यात आले हे निर्णय :
विभाग शासन निर्णय
ग्रामविकास 22
कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय 22
उच्च आणि तंत्र शिक्षण 21
गृह विभाग 20
आदिवासी विभाग 19
मृद आणि जलसंधारण 17
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य 14
सहकार म्हणून आणि वस्त्रोद्योग 13
सार्वजनिक बांधकाम 13
कौशल्य विकास आणि उद्योजकता 12
महिला आणि बालकल्याण विभाग 10
सार्वजनिक आरोग्य 73
पाणीपुरवठा आणि स्वच्छता 68
शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग 43
सामान्य प्रशासन विभाग 34
जलसंपदा विभाग 24
महसूल व वन विभाग 24
वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य 24
अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्याकारणाने प्रशासकीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर निर्णय होत आहेत.